*केज – तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचा मृतदेह दैठणा गावाच्या जवळ (ता. केज) आढळून आला असून घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोमवारी (दि.०९) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास संतोष देशमुख यांचे टोलनाका जवळून अपहरण झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हे त्यांच्या चारचाकी वाहनातून (एमएच ४४ बी ३०३२) मामेभाऊ शिवराज लिंबराज देशमुख यांच्यासह मस्साजोगकडे जात होते. मार्गात डोणगाव टोलनाका जवळ चारचाकी वाहनातून आलेल्या आलेल्या व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली.
त्या गाडीतून उतरलेल्या सहा जणांनी संतोष देशमुख यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांना ओढून काठीने मारहाण केली आणि नंतर त्यांना बळजबरीने गाडीत बसवून केजच्या दिशेने घेऊन गेले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात शिवराज देशमुख यांनी दिली. सदर तक्रारीवरून सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांची दोन पथके तातडीने देशमुख यांच्या शोधासाठी निघाली. मात्र काही वेळानंतर दैठणा गावाच्या रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला.
Discussion about this post