
लोहा / प्रतिनिधी..
मौजे डोंगरगाव ता.लोहा येथे परलोकी महंत बळीगीर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि.12.12.2024..रोजी भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,त्यात प्रामुख्याने सकाळी 11.वाजता बागेतील महाराजांच्या समाधीचा अभीषेक तसेच 11 ते 01.पर्यंत सर्व रोग निदान व रक्तदान शिबीर व त्यानंतर दिवसभर महाप्रसाद आणि रात्री 09 ते सकाळी 05 पर्यंत महापुजा व ठिक 06.वाजता काकडा आरती होईल पुजेसाठी खासकरुन दहीकळंबा,दाताळा,आलेगाव,
हरबळ, बोरगाव,मुजरा,बोरी, चोंडी व पंचक्रोशीतील सर्व नामांकित भजनी मंडळी चा कार्यक्रम आयोजित केला आहे.. त्यामुळे परलोकी महंत बळीगीर महाराज यांचे शिष्य मंडळ नांदेड,लातुर,परभणी , हिंगोली या जिल्ह्यांत पसरलेले आहे.त्यामुळे कार्यक्रमाला जिल्हा व जिल्हृयाबाहेरुन सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.आणि महापुजेवर माहुर सह मराठवाड्यातील सर्व संत महंत येणार असल्याने एकाच वेळी सर्व संतांच्या दर्शनाचा लाभ भक्तांना घेता येणार आहे.त्यामुळे सर्व भाविकांनी या महायोगाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन मठाधिपती गुरूवर्य कैलासगिर महाराज यांनी केले….
Discussion about this post