गुहागर प्रतिनिधी (नरेश मोरे):
कोकण आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ म्हणून वेगाने उदयास येत आहे. कोकणातील हिरवळ , नारळाची झाडे , सुंदर किनारे ,धबधबे , पर्वत आणि हिरव्यागार डोंगर , द-या प्रवाशांना निश्चितच समृद्ध आणि सुखद अनुभव देतात असं स्थळ म्हणजे कोकण.या कोकणातमध्ये पारंपरिक लोककला शक्ती-तुरा पहायला मिळतो. शक्ती-तुरा सामुहिक नृत्यांचा प्रकार आहे.
जाखडीचा जंगी सामना जणू प्रेक्षकांना पर्वणीय आहे. अशाच ग्रामदेवतेच्या मंदिर परिसराचे सुशोभीकरण निधी संकलनासाठी गुहागर पाली श्री स्वयंभू पालेश्वर पाली ग्रामविकास मंडळ (रजि.) महाराष्ट्र तर्फे शक्ती-तुरा आयोजन करण्यात आले असून ,हा कार्यक्रम बुधवार दि.१४ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८ वाजता साहित्य संघ मंदिर (चर्नी रोड) मुंबई येथे होणार आहे.
हा रंगतदार सामना भानुदास घराणे कवी सोनु भाऊ,जाणु-नारायण,बाबाजी-सदानंद , कृष्णा -अर्जुन, वस्ताद वसंत -मास्तर कवी श्री भिकाजी भुवड (मास्तर) यांचे पटृ शिष्य शक्तीवाले शाहीर विजय पेजले (शाखा आई जीवदानी कला पथक ,विरार) विरुद्ध मूळगादी बाबू रंगले घराणे भिवा शंकर , नारायण गुरव, यांचे बाब्या राजाराम, बबन -विशाल, वस्ताद गणेश भिकाजी, गणपत,यांचे विकास प्रभाकर यांचे शिष्य तुरेवाले शाहीर संतोष कोलापटे (शाखा ओम साई नाच मंडळ मालाड ,मुंबई) यांचा होणार आहे.
या जबरदस्त दोन शाहीरांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. तरी या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहुन निधी संकलनासाठी सहकार्य करावे असे आवाहन शाहीर संतोष कोलापटे यांनी केले आहे. अधिक माहिती संपर्क संतोष कोलापटे ८८५००७६००३, शंकर कळंबाटे ८१०८३५३८६१.
Discussion about this post