सारथी महाराष्ट्राचा
शिरूर तालुका प्रतिनिधी
सुरेश आप्पा गायकवाड
सोनेसांगवी येथील ग्रामदैवत हनुमान महाराज मंदिरात समस्त ग्रामस्थ सोनेसांगवी करांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार १४ डिसेंबर २०२४रोजी श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे.
सकाळी ९:०० ते १२:०० वाजेपर्यंत सोनेसांगवी गावामधील सर्व भजनी मंडळ मिळून भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सायंकाळी ठिक ०६:३० वाजता दत्त जन्मावर ह.भ.प. माऊली महाराज पवार भांबार्डे यांचे जाहीर हरी किर्तन होणार आहे. रात्री किर्तनाच्या कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले असून मोठ्या उत्साहात श्रींचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
शनिवार दि.१४ डिसेंबर २०२४ रोजी दत्तजयंती कार्यक्रम सकाळी ०९:०० वाजल्यापासून पुढे आयोजित केला आहे, तरी सर्व ग्रामस्थांनी, महिला भगिनींनी, सर्व तरुण वर्ग मित्र परिवाराने सहकुटूंब, सहपरिवार उपस्थित राहून दत्त जयंती कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसाद भोजनाला उपस्थित राहवे ही समस्त ग्रामस्थ सोनेसांगवी करांची आपणांस आग्रहाची, आपुलकीची विनंती…!!!🚩🤝🙏
Discussion about this post