दैठणा प्रतिनिधी
परभणी तालुक्यातील दैठणा – माळसोना या रस्त्याच्या कामासाठी बांधकाम विभागाने 19 कोटी रुपये मंजूर केलेले आहे हे काम सुरू होऊन एक महिना होत आहे या महिनाभराच्या कामांमध्ये काही पुलाचे काम झाले आहे तसेच दोन्ही साईटने मुरूम भरून त्यावर पाणी न टाकता दबई करण्यात येत आहे त्यामुळे हा रस्ता अनेक गावांना जोडणारा असल्यामुळे रहदारी जास्त प्रमाणात होते 2चाकि वाहने चालवताना त्रासाचा सामना करावा लागतो सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यापुढे तरी या रस्त्याकडे लक्ष देऊन गुणवत्ता पूर्व काम करून घेणार का असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत.
Discussion about this post