राजगुरुनगर: दावडी (ता.) खेड येथे ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालय, आंबी येथे शिक्षण घेणाऱ्या कृषीदूतांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.
कृषीदूत हर्षल घाडगे, गौरव बिरारी, वितराग गांधी, रोहन लोंढे, स्पंदन जिबेंनकर, सत्चीत भिमेश बैंडला हे पुढील तीन ते चार महिने गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून विविध आधुनिक तंत्रज्ञान, जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा पीक पद्धतीची माहिती देणार आहेत.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम चेअरमन डॉ. प्राजक्ता मोडक, डॉ. प्रशांत घाडगे, डॉ. अविनाश खरे, प्राचार्य पांडुरंग जगताप, प्राचार्य प्रीती नवलकर, प्राचार्य नीलम बांगर यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार आहे. यावेळी सरपंच सौ. पुष्पा होरे, ग्रामसेवक मोहन गरजे, उपसरपंच सौ. धनश्री कान्हूरकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
Discussion about this post