


सिद्धार्थ कदम..
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी..
पुसद /वाशिम :-
कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपणाऱ्यांसाठी तसेच निराधार,गरीब बेसहारा लोकांसाठी मदत करण्याच्या हेतुने सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत तसेच त्यांच्या पत्नी प्रज्ञा भगत,मुलगी कु.स्वरा भगत यांनी एका बेसहारा आणी वृध्द महिलेला स्वेटर,ब्लॅकेट,मफलर आणी खावु भेट देवुन माणुसकीची ऊब दिली आहे.विविध समाजपयोगी ऊपक्रमांच्या माध्यमातुन भगत परिवार सामाजिक दायित्व जोपासण्याचा प्रयत्न करीत असल्याने या प्रेरणादायी कार्याचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.
गरीब-श्रीमंत असा भेद न करणारी थंडी साऱ्यांनाच जाणवते. संवेनशील माणसे अशावेळी समाजातील उपेक्षितांसाठी पुढे येतात. कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपणाऱ्यांसाठी आणी बेसहारा गरीबांसाठी मदत करायला पुढे येवुन सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत आणी त्यांच्या परिवाराने समाजॠण फेडण्याचा प्रयत्न केला आहे.जिथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तिथे थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार ब्लँकेट मिळणे अशक्यच. त्यामुळेच आपण काही तरी करावे म्हणून फुलचंद भगत यांनी स्वतःच्या कमाईतून उघड्यावर संसार थाटलेल्या गरीब बेसहारा ८७ वर्षीय वृध्देला माणुसकीची ऊब मिळावी म्हणून ब्लँकेट,स्वेटर देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या या विचाराला कृतीची साथ देण्यासाठी त्यांच्या परिवारानेही राञी कडाक्याच्या थंडीत वृध्द महिला कुडाच्या मोडक्या घरात राहत असलेल्या ठिकाणी जावुन भेट घेतली.फूटपाथवर राहणाऱ्या गरीब निराधार लोकांना लोकरीच्या कपड्यांशिवाय थंडीचा सामना करावा लागतो. लोकरीच्या कपड्यांअभावी दरवर्षी शेकडो लोक कडाक्याच्या थंडीत मरतात. ते लोक गरिबीमुळे असहाय्य आहेत.गरजू गरीब लोक कडाक्याच्या थंडीत फूटपाथवर राहतात ज्यामुळे या निराधार गरीब लोकांना आराम आणि थंडीपासून संरक्षण मिळेल आणि त्यांना शांत झोप मिळेल यासाठी समाजसेवी आणी प्रशासनानेही पुढाकार घेवुन मदत करायला हवी असे आवाहनही केले आहे.राज्यातील पारा घसरत असल्याने हुडहुडी भरणारी थंडी सुरु झाली आहे. त्यातच वाशिम जिल्ह्याचे तापमान 11 अंश सेल्सियसपर्यंत कमी झाल्याने चांगलीच थंडी वाजत आहे. या थंडीमध्ये रस्त्यावर राहणाऱ्या लाेकांचे हाल हाेत.त्यामुळे अशा गरजुंना मदत करण्याचा ऊदात्त हेतु ठेवुन पञकार फुलचंद भगत यांनी मदतीचा हात दिला आहे.
सध्या हिवाळा सुरु आहे. त्यामुळे कड्याकाची थंडी पडत आहे. सर्वांना थंडीपासून बचावासाठी शेकोटी, उबदार कपडे यांची मदत घेण्याची गरज भासू लागली आहे. सर्वजण घरामध्ये गरम वातावरण करून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, रस्त्यावर राहणारे तसेच गोरगरीब लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी जास्त काही करू शकत नाहीत.मानवतेच्या भावनेतून वंचितांना प्रत्येकाने मदत करायला हवी. आपण प्रत्येकजण पुढे आलो, तर समाजात निर्माण झालेली दरी काही अंशी कमी होण्यास मदत होऊ शकेल.या ऊदात्त भावनेतुन सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत,प्रज्ञा भगत,कु.स्वरा भगत यांनी सहपरिवारासह जावुन गरजु वृध्देला ब्लॅकेट,स्वेटर,मफलर आणी खावु भेट देवुन मायेची ऊब दिली. गरजवंतांची गरज पूर्ण झाल्यानंतर माझ्या आणी परिवाराच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहून धन्य वाटते असे भावनिक ऊद्गार फुलचंद भगत यांनी व्यक्त केले.सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन यापुढेही केले जाईल असेही सांगीतले.फुलचंद भगत यांना अशा विविध सेवाभावी कार्याबद्दल विविध राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले आहे.इतरांनीही प्रेरणा घेवुन घरीबांसाठी कार्य करावे असे सांगीतले..
Discussion about this post