गावातील घराच्यावरील ११ केव्हीच्या तारा तात्काळ हटवा :+ प्रमोद श्रीरामे
ग्रामपंचायत तर्फे महावितरणला निवेदन
:- समीर बल्की प्रतिनिधी तालुका चिमूर
खडसंगी गावामधुन फॉरेस्ट कार्यालय ते ग्रामदर्शन विद्यालय पर्यंत गेलेली ११ केव्ही विजेची तार ही गावातील २० ते २५ घराच्या वरुन जवळपास अंतरावर आहे. आणि आता पर्यंत सदर विजेच्या तारेमुळे अनेक जिवीतहानी झालेली आहे. आणि ग्रामपंचायतने या अगोदर सुध्दा महावितरण कंपनीला अनेकदा निवेदन दिलेले आहे. तरी सुध्दा ती ११ केव्ही लाईनच्या तारा तश्याच आहे. यामुळं अनेकांना घराच्या वरील भागात बांधकाम करता येत नाही आहे
. काही काम करतो म्हंटले तर विजेचा शॉक लागण्याची भिती असते. दि. १२ ऑगस्ट २०२४ सोमवार ला वसंतरावजी चौखे यांचे याच घराच्या वर असलेल्या ११ केव्ही विजेच्या तारामुळे करंट लागून मृत्यु झाला.
तरी विजवितरण कंपनीला वारंवार सांगीतले असता विज वितरण कंपनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. यानंतर समोर जावून जर विज वितरण कंपनीने घराच्या वरील तारा हटविले नाही तर अशीच घटना वारंवार घडत राहील.
त्यामुळं यानंतर याची जबाबदारी महावितरण कंपनीची राहील. असे निवेदन महावितरण कंपनीला देण्यात आले.
यावेळी खडसंगीचे सरपंच प्रियंका कोलते, उपसरपंच संदीप भोस्कर, माजी पंचायत समिती सदस्य अजहर शेख, माजी उपसरपंच प्रमोद श्रीरामे, राकेश जिवतोडे, संतोष देशमुख, इरफान पठाण, पंढरी श्रीरामे, सीमा वाकडे आदी गावकरी उपस्थित होते.
Discussion about this post