उपक्रमाची ओळख
‘माझी शाळा, सुंदर शाळा’ हा शासकीय उपक्रम शिरूर तालुक्यातील डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालय येथे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शाळा सुशोभीकरणा सह शालेय परिसर स्वच्छता, आणि विदयार्थी यांच्यात आरोग्य विषयक जागृती करणे हा आहे.
शाळा सुशोभीकरण आणि स्वच्छता
या उपक्रमात शाळेच्या परिसराचे सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. शाळेच्या आवारात विविध फुलांचे रोपण करण्यात आले आहे, ज्यामुळे वातावरण प्रसन्न झाले आहे. याचबरोबर, शाळा परिसर सफाईसाठी विदयार्थी आणि शिक्षकांनी मिळून एकत्र मेहनत घेतली आहे. यामुळे शाळेच्या परिसरात सदैव स्वच्छता टिकवली जात आहे.
आरोग्यविषयक जागृती
विदयार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागृती वाढवण्यासाठी विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, पोषण आहार, व शारीरिक तंदुरुस्ती यांबद्दल माहिती दिली गेली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जागरूकता वाढली आहे.
शिक्षकांचे मार्गदर्शन
मुख्याध्यापिका विमल झावरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ शिक्षक अनिल खंदारे, सौ. धनश्री सरोदे, कविता धावडे, दत्तात्रय कर्डिले, निकिता जाधव, शुभम खुपटे यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. त्यांचा मोठा सहभाग असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला आहे.
उत्साही सहभाग
या उपक्रमामध्ये शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. शिरूर तालुक्यातील इतर शाळांनी देखील ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमातून प्रेरणा घेऊन असेच उपक्रम राबवावेत, असा संदेश डी. एन. ताठे माध्यमिक विद्यालयाने दिला आहे.
Discussion about this post