5 Total Views , 1 views today
कोकणात डेरवण येथे प्रथमच २०१९ साली वालावलकर हॉस्पिटल ने बॅचलर इन फिजियोथेरपी हा महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठशी संलग्नित असा पदवी अभ्यासक्रम सुरु केला. दर वर्षी ४० अश्याप्रकारे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण आणि त्याच बरोबर हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार अशी रचना केली गेली आणि त्याला प्रतिसाद म्हणून आजपर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नागपूर अशा विविध झोनमधील फाउंडेशन बॅचमधील ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि विविध प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. यापैकी काहींनी विविध महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे.
हेच उच्च शिक्षण आता वालावलकर फिजियोथेरपी कॉलेज मधेच उपलब्ध व्हावे आणि त्याचा फायदा कोकणातील रुग्णांना व्हावा या करता संस्थेने पाच विषयात उच्च पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याची मान्यता विद्यापीठाने दिली आहे. त्यात मस्कुलोस्केलेटल(अस्थिरोग,स्नायू आणि सांधे) फिजिओथेरपी – 03 जागा, न्यूरोफिजिओथेरपी( मज्ज संस्था आणि मेंदू मुळे उद्भवणारे अपंगत्व ) – 06 जागा, – हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (खास हृद्य रोगासाठी)फिजिओथेरपी – 03 जागा, कम्युनिटी-बेस्ड फिजिओथेरपी (समुदायामध्ये आरोग्य आणि कल्याण ) – 03 जागा, स्पोर्ट्स फिजिओथेरपी – 06 जागा ह्या पाच विषयांची मान्यता प्राप्त झाली आहे.
हे मास्टर्स डिग्री चे कोर्सेस दोन वर्षाचे असून त्यामध्ये उपचार कौशल्य आणि संशोधन ह्या वर विशेष भर दिला जाणार आहे
ह्या करता सुसज्ज वर्ग खोल्या , स्मार्ट बोर्ड टीचिंग,प्रशिक्षणासाठी उच्च दर्जाचे सिमुलटर ,बायो मेलानिकेल गेट लॅब फॅसिलिटी ,मोव्हमेन्ट डिसऑरेंडर च्या पृथक्करनाची सोय ,क्लिनिकल अँप्लिकेशन,बाह्य रुग्ण विभागात हृदय रोग पुनर्वसनासाठी कार्डियाक फिटनेस केंद्र असे स्वतंत्र कक्ष अश्या सोयींनी युक्त असे हे दालन पदवी विद्यार्थी आणि रुग्ण यांच्या सेवेत रुजू झाले आहे.
१0 उच्च शिक्षित एम पी टी इन फिसिओथेरॅपी अध्यापक , १८ पीजी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी नियुक्त केले आहेत .ह्या उपक्रमाची सुरवात २२ नोव्हमेंबर रोजी करण्यात आली . मुख्याध्यापक प्रोफेसर चंद्रशेखर यांनी विद्यार्थ्यांना एक उत्कृष्ट फिसिओथेरॅपीस्ट होण्याकरता चिकाटी, जिद्द, आणि रुग्ण सेवा हे तीन गुण असणे किती आवश्यक आहे याचे महत्व सांगितले.
Discussion about this post