देवळा प्रतिनिधी – भारत पवार
देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयात विद्यालयाचे संस्थापक कर्मवीर रामरावजी आहेर स्मृती सप्ताहानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी देवळा एज्युकेशन सोसायटी चे प्रशासन अधिकारी प्रा.बापू रौंदळ यांनी वरील उद्गार काढले.
आज जिजामाता कन्या विद्यालय देवळा येथे कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या स्मृतिसप्तहाचे उद्घाटन वक्तृत्व स्पर्धेने करण्यात आले त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्रा. रौंदळ बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता पगार होत्या. या स्पर्धेत एकूण ५० स्पर्धकांनी भाग घेतला.परीक्षक म्हणून श्रीम.विद्या भामरे,संगीता दाभाडे,लाखन करवंदे,योगिता ठाकरे यांनी काम पाहिले. विजयी स्पर्धकांची संस्थांतर्गत स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक के.एम. खोंडे, एस टी पाटील, अनिशा आहेर,भास्कर सागर व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.एस.के. आहेर,एन.यू.रौंदळ आणि गीतमंचाने इशस्तवन,स्वागतपद्य सादर केले. स्पर्धकांनी अतिशय उत्साहाने आपले विचार मांडले.मुख्याध्यापिका सुनीता पगार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एन आहेर यांनी केले तर आभार विद्या भामरे यांनी मानले.
Discussion about this post