

सोयगाव :
रिपब्लिकन सेनेचे सोयगाव तहसीलदारांना निवेदन,
सोयगाव..
भारत देशाचे संविधांकर्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्त्यामुळे बाबासाहेबांचा अवमान झाला आहे.अमित शहा यांच्या निषेधार्थ रिपब्लीकन सेने तर्फे सोयगाव येथे मंगळवारी (दी.२४) डॉ.बाबसाहेब आंबेडकर पुतळा ते छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात शहा यांच्या प्रतीकात्मक फोटोची अंत्ययात्रा काढण्यात येऊन जोडेमारत दहन करण्यात आले.
त्यानंतर तहसील कार्यालया पर्यंत प्रचंड घोषणाबाजी करीत तहसील कार्यालय सोयगाव पर्यंत रॅली काढण्यात येऊन तहसीदार मनीषा मेने जोगदंड यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात गृहमंत्री अमित शहा यांचा तीव्र निषेध करण्यात येत असून त्यांनी महामानवाच्या केलेल्या अवमान प्रकरणी तात्काळ राजीनामा देऊन देशाची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी तहसीलदार मनीषा मेंनें यांनी आपल्या संतप्त भावना राज्य व केंद्र शासनाकडे पाठवत असल्याचे निदर्शकांना आश्वासन दिले.
या निवेदनावर रिपब्लीकन सेनेचे अध्यक्ष अंकुश मधुकर पगारे,राजू वानखेडे,दीपक नवगिरे,सुमित वानखेडे,मधूकर पगारे,दीपक नवगीरे,नितेश साळवे,नितीन पगारे, सागर सोनवणे,संग्राम बिऱ्हा रे,सुभाष बावस्कर व अनंत बनकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या यात्रेत शेकडोच्या संख्येने महिला,पुरुष व युवक सहभागी झाले होते.
फोटो ओळ: – सोयगाव – १) संविधांकर्ता डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी गृहमंत्री शहा यांची सोयगाव शहरात काढण्यात आलेल्या तिरडी यात्रेत सहभागी महिला,पुरुष व युवक
२) छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात अमित शहा यांच्या प्रतिमेचे दहन करतांना रिपब्लीकन कार्यकर्ते,
३) संविधांकर्ता डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी गृहमंत्री शहा यांनी तात्काळ राजीनामा देऊन देशाची माफी मागावी या मागणीचे निवेदन देतांना- रिपब्लीकन सेनेचे पदाधिकारी..
Discussion about this post