विहिरगाव प्रतिनिधी:-रजत चांदेकर

राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे प्रकल्पग्रस्तांची चर्चा सभा आयोजित करण्यात आली यावेळी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या मंगी डिगडोह प्रकल्प दहेगाव गारगोटी प्रकल्प अंतर्गत दहेगाव येथे नाम फलकाचे अनावरण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ चव्हाण हस्ते करण्यात आले तसेच ग्रामपंचायत भावनात प्रकल्पग्रस्तांच्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा सभेचे आयोजन करण्यात आले होते विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या दहाव्या वर्षाच्या ऐतिहासिक संघर्षाला यश प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदाच दहेगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सरकारे विदर्भातील सरळ खरेदी धारक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 832 कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले तर संपूर्ण प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला तसेच अमरावती विभागातील भूसंपादनाचा प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी अमरावती येथे प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली या संपूर्ण समस्यासाठी विदर्भ घड्याळाच्या प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून ऐतिहासिक संघर्ष सुरू होता संपूर्ण झालेल्या चर्चा सभेतून प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यावर चर्चा करण्यात आली यावेळी संघटनेचे केंद्रीय सहसचिव अजय भोयर यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन मलमकार कार्यकारणी सदस्य राजू लोणकर उपस्थित होते दहेगाव येथील शाखाध्यक्ष दिलीपराव निखाडे सचिव सुनील परचाके विनोद कुरसंगे नाना टेकाम पसंत आत्राम सज्जन कोंडेकर प्रल्हाद खडसे रमेश कुमकर संतोष कुरसंगे अन्नपूर्णा चरडे प्रभावती केदार रमा कातकर विठ्ठल आत्राम जीवन कुबडे श्याम कुबडे जानरावजी हरबळे नारायण हरबडे गावच्या सरपंचा सौ राधाबाई टेकाम सदक्ष रवी भाऊ टेकाम प्रामुख्याने उपस्थित होते
Discussion about this post