
मागण्या-1-हंगामी फवारणी कर्मचारी व क्षेत्र कर्मचारी यांचे वय वर्षे 60 झालेल्या कर्मचाऱ्यांना उपदान देऊन केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या धोरणानुसार किमान पेन्शन लागू करावी.
2- हंगामी फवारणी कर्मचारी व क्षेत्र कर्मचारी यांचे एक वेळ विशेष बाब म्हणून शासन सेवेत समावेशन करावे.
3- हंगामी फवारणी कर्मचारी व क्षेत्र कर्मचारी यांचे वय 60 झालेल्या व मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या एक पात्र पाल्याचे पुर्वी प्रमाणे अनुकंपा तत्त्वावर घेण्यात यावे.
4- 6 व्या वेतनाचा फरक त्वरित देण्यात यावा.
संदर्भ – 1- संघटनेचे पत्र दिनांक 7/12/2024 रोजी आपणांस व प्रशासनास दिलेल्या पत्रकान्वये
2- मा, सहसंचालक सो, आरोग्य सेवा हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग पुणे 06 यांनी शासनास सादर केलेला प्रस्ताव जा,क्र,संराआसे / किजरो/ आस्था/ हक्क/ एकवेळ समावेशन / प्रस्ताव/ 15149-51 दिनांक 06/0
6/2024
आदरणीय महोदय,
सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना तातडीने न्याय दिल्या मुळे आपले व आपल्या शासनाचे प्रथमतः आभार,
तसेच महोदय, हंगामी फवारणी कर्मचारी व क्षेत्र कर्मचारी देखील सार्वजनिक आरोग्य विभागाचा एक भाग आहे व त्यांच्या साठी संघटना 30 ते 35 वर्षा पासून वरील मागण्यांसाठी लढा देत आहे व यासाठी आपल्या स्तरावरुन मान्यही करण्यात आले आहे. परंतु प्रशासनाच्या चालढकल धोरणामुळे आतापर्यंत यश प्राप्त झाले नाही,परत संदर्भ 1 नुसार प्रस्ताव गेलेला आहे. त्यासाठी संघटनेमार्फत मागण्या पूर्ण होण्यासाठी निवेदने, मोर्चा,आंदोलने, उपोषण, न्यायनिवाडे हे संपूर्ण कार्यक्रम राबवून सुध्दा न्याय मिळत नसल्याने हंगामी फवारणी कर्मचारी व क्षेत्र कर्मचाऱ्यांचा बांध फुटला आहे.
त्यामुळे अखेरचा मार्ग म्हणून शासनास व प्रशासनाविरोधात सामुहिक आत्मदहनाचा निर्णय हंगामी फवारणी व क्षेत्र कर्मचाऱ्यांनी घेतला होता त्यामुळे मा.सहसंचालक सो व संचालक सो,पुणे यांनी संदर्भ एक देऊन आपणांस व प्रशासनास विनंती करून प्रस्ताव दिला आहे.तरी आपणांस विनंती की,आपण सार्वजनिक आरोग्य विभागातील इतर कर्म चाऱ्यांना न्याय दिला त्या धर्तीवर हंगामी फवारणी कर्मचारी व क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या वरील मागण्या/ प्रस्ताव मंजूर करून सार्वजनिक आरोग्य विभागाला अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत.
अन्यथा हंगामी फवारणी कर्मचारी व क्षेत्र कर्मचारी हे उग्र रूप धारण करून पुन्हा आपल्या दालनात सामुहिक आत्मदहनाचा विचार केला तर संघटणा काहीही करू शकणार नाही व परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते व होणाऱ्या परिणामास शासन व प्रशासनास जबाबदार राहतील याची नोंद घेऊन त्वरित विभागास आदेश देऊन हंगामी फवारणी कर्मचारी व क्षेत्र कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती.
सहकार्य करावे , धन्यवाद.
आपल्या अवलोकनार्थ प्रस्तावाची प्रत, संघटनेचे पत्र व आमदारांचे शिफारस पत्र जोडले आहेत.
बाळासाहेब भुजबळ
प्रदेश अध्यक्ष
भास्कर किड्स ईकर
प्रदेश उपाध्यक्ष
प्रभाकर वाघ
प्रदेश चिटणीस
अरूण नक्षिणे
प्रदेश सरचिटणीस
अमोल पाटील
प्रदेश सरचिटणीस..
Discussion about this post