
प्रतिनिधी : मारोती धुप्पेकर
कृष्णामाई विद्यामंदिर शाळेतील माझी विद्यार्थी कैलास गाढे परदेशात नोकरी करुन परत आल्या बदल व माझी विद्यार्थी संतोष कटके हे सॉफ्टवेअर इंजीनियर म्हणुन IT क्षेत्रात नौकरी मिळवल्या बदल त्यांचा कृष्णामाई विद्यामंदिर बळेगाव येथे शाळेच्यावतीने यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस दिल्या.
तेव्हा बोलतांना ते म्हणाले की आज माझ्या मित्रांनी आणि शाळेने माझा सत्कार केला त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे.ज्या ठिकाणी मी आज पोहोचलो त्याच श्रेय तुम्हाला जाते कारण मित्रांची साथ आणि त्यावेळी शाळेने दिलेल्या चांगल्या संस्कारांनी मी हा प्रवास करू शकलो म्हणून मी तुमचा सर्वांचा ऋणी आहे.
आपली संगत आणि शिक्षण या दोन गोष्टी बरोबर असल्या की आपण घडत जातो, मला मित्र म्हणून तुमची संगत आणि कृष्णामाई विद्यामंदिर माध्यमिक शाळा, बळेगाव इथून शिक्षण व संस्कार झाले हे माझे भाग्य आहे. आणि तुम्ही दिलेल्या सन्मानाची मी कायम जान ठेवेल आणि त्यानुसारच भविष्यात जेवढं माझ्याकडुन होईल तो चांगला बदल आपल्या शाळेसाठी व समाजासाठी करण्याचा प्रयत्न करेल आशी प्रतीक्रिया दोघांनी पण दिले. यावेळी गावातील सरपंच शहाजी पाटील गाढे, शिक्षक सालेगावेसर, मिरदोडेसर, एम.एम.गाढेसर ,काटेसर, देशमुखसर, कांबळेसर, आमृतवाडसर, लोधसर, सौ.जाधव मॅडम, ढोनेमामा, गुंडेवारमामा, व गावातील आदी उपस्थितीत होते..
Discussion about this post