पिंपळटक्का गावातील शिक्षक, पठाण सर यांनी आज सेवावृत्ती स्विकारली, त्यासंदर्भात बोलतांना पत्रकार इंद्रमोहन कदम यांनी आपल्या भावना व सरांनी आतापर्यंत केलेली सेवेचा थोडक्यात आढावा घेतला
#_आदरणीय_गुरुवर्य_पठाण_सर, आपण म्हणजे एक संघर्षशील व्यक्तीमत्व , निर्भिड वैचारिक शैली, उत्तम संघटन, आदर्श शिक्षक , प्रशासनाची जान असणारे , कुशल मुख्याध्यापक आशा अनेक भुमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकरणारे , अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे सर आपण आहात,
गेल्या अनेक वर्षांत शाळेच्या जडणघडणीत सर आपला मौलाचा वाटा राहिला आहे ,आपण एक शिक्षिक म्हणून आम्हा विद्यार्थ्यांना काही कमी पडू दिलं नाही ,मला तर आजही आठवतंय , मला एखाद्यावेळी गणित आले नाही , तर जवळ घेऊन आपण म्हणत होतात बघू कसं केलसं आणि आपण सांगत होतात की येथपर्यंत तर बरोबरचं आहे ,शेवटची स्टेप आसी नव्हती , तर आपण स्वतःहा करुन दाखवत म्हणत होतात की आसी होती, आणि हो सर , आपण म्हणायचात गणीती हा विषय फक्त आणि फक्त आकडे मोडीचा आहे, यात काही विशेष नाही,इतकं सहज रित्या आपण सांगत होतात, मला एकेकाळी गणित हा विषय असला तर शाळेत येऊ वाटतं नव्हतं, पण आपण पिंपळटक्का शाळेत आलात आणि मला गणित हा विषय असला की, माझ्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसतं होता, तो आनंद केवळ आणि केवळ आपल्यालामुळेच दिसत होता,
आणखीन सांगायचे म्हटलं तर ,राष्ट्र सेवा सामाजिक सेवा आमच्या मनात रूजवण्याचे काम देखील आपणचं केले, मला आणखीन एक सांगायचं म्हटलं तर ,आपल्या ध्यानात आसेल नसेल तो प्रश्न वेगळा, पण मला चांगले आठवत आहे की,आपण मला अनेक कारणांमुळे शाळेत मारले आसेल, पण मला गणित आले नाही म्हणून कधीच मारले नाही, तर जवळ घेऊन नेहमी समजून सांगितले ,
सर आज आपण अनेकांच्या आयुष्याचे दिपस्तंभ राहिलात, त्यातीलचं मी एक आहे,आपण अनेक विद्यार्थ्यांचे मित्र आहात,सहकार्याचे आधारवड आहात ,आणि कुटुंब वत्सल्यही आहात, घर, नौकरी, शेती,संघटन, समाजकारण यांचा मेळ नेमका तुम्ही साधला आहे ,यांचा गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे,विद्यार्थ्यांतील गुण ओळखण्याची आणि विध्यार्थ्यांना हाताळण्याची आपली हातोटी अलौलकिक आहे,तुमचा स्वभाव कितीही शिस्तप्रिय असला, तरी मायेने भरलेलं अंतःकरण आणि पाठीवरती हात,ठेवुन आम्हा लढण्याचं बळ प्रेरणा आणखीनही देतं आहे …….सर आपल्याला आपल्याचं भुमितम्हणजे पिंपळटक्का गावात सेवा करण्यास भाग्य मिळाले ते भाग्य आम्ही आमचेही समजतो, त्यामुळे तर मी आज आपल्या बद्दल एवढे लिहु शकलो,आपण आपल्या गावात सुद्धा आपण आपले कार्य यशस्वीरीत्यापार पाडले, पण सर मला आजही त्या क्षणाचं दु:ख वाटतंआहे की,आपल्या गावांसाठी व गावांतील विध्यार्थ्यांसाठी आपल्याला करू वाटणारे कार्य हे कोणाच्या तरी नजरेत आणी मनात खटकले आणि आपल्याला हेच कार्य नाईलाजाने दुसर्या गावातील विध्यार्थ्यांनसाठी करावे लागेले,सर त्यावेळेसचा सर्व स्टाफ,आपण व आपल्या सोबत असणारा सर्व स्टाफ, आपण मुख्याध्यापक म्हणून खूप चांगल्याप्रकारे सांभाळला,शिस्तप्रिय, संयमी, सदाचारी, भावुक, निस्पृह सर आपण आज सेवानिवृत्त होतं आहात, तरी पण आपले हे शिक्षण क्षेत्रातील कार्य अजरामर राहील……..आपल्या समाजीक शैक्षणिक संघर्षच्या कार्याला माझ्या सारख्या विध्यार्थ्यांचा सलाम, व आपण आतापर्यंत केलेल्या कार्यासाठी आपले खुप – खुप अभिनंदन…..व आपल्याला येणार्या भविष्यासाठी खूप – खूप शुभेच्छा….सर…..💐💐💐💐💐
आपलाच एक विश्वासु
विध्यार्थी,इंद्रमोहन त्रिंबक कदम
Discussion about this post