धुळे, शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याचा शब्द मी धुळेकर जनतेला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिला होता .या शब्दाच्या पूर्ततेच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना मला मनस्वी आनंद होत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असे स्मारक आकाराला येईल.
आज मी व माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर तसेच पदाधिकारी, महापालिकेचे अभियंता रावसाहेब उगले यांच्यासह जुन्या स्मारक स्थळी पोहोचलो.
तेथे छत्रपती शिवरायांना अभिवादन करून स्मारकासाठीच्या जागेची पाहणी केली.
आपल्या प्रेरणास्थान शिवरायांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी धुळे शहर नव्हे तर जिल्ह्यातील आणि सबंध राज्यातून शिवप्रेमी जनता येईल इतके सर्वांग सुंदर पवित्र स्मारक साकारेण याची ग्वाही मी देतो .जय शिवराय…
🚩🙏आमदार अनुप ओमप्रकाश अग्रवाल धुळे शहर विधानसभा
#BJP4IND #BJP4Maharashtra #BJPGovernment #shivajimaharaj #shivajimaharaj
Discussion about this post