पेण तालुक्यातील खरोशी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन रायगड जिल्हा परिषद शाळा वलक या ठिकाणी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री. प्रफुल्ल सुखाचैन सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या असून त्यात रायगड जिल्हा परिषद शाळा दूरशेत या शाळेने भरघोस बक्षीस मिळवून केंद्रात आपले नाव उच्च स्थानावर ठेवले आहे. यावर्षी खेळवण्यात आलेले सामने लगोरी, समूहगीत, नृत्य, पथनाट्य, लंगडी,दोरी उड्या या सर्व क्रीडा स्पर्धेत दूरशेत शाळेने यश संपादन केले आहे.
1) लगोरी लहान गट तृतीय क्रमांक2) लगोरी मोठा गट तृतीय क्रमांक3) समूहगीत लहान गट प्रथम क्रमांक4) समूहगीत मोठा गट द्वितीय क्रमांक 5) नृत्य लहान गट प्रथम क्रमांक 6) नृत्य मोठा गट प्रथम क्रमांक 7) पथनाट्य लहान गड प्रथम क्रमांक 8) पथनाट्य मोठा गट प्रथम क्रमांक 9) लंगडी मोठा गट तृतीय क्रमांक 10) दोरी उड्या लहान गट द्वितीय क्रमांक भक्ती देवेंद्र डंगर 11) दोरी उड्या मोठा गट तृतीय क्रमांक तिर्था भूषण भोईर वरील सर्व स्पर्धांमध्ये दूरशेत शाळेतील विद्यार्थी आपले स्थान उच्च स्तरावर ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत.
तसेच दूरशेत गावातील गणेश पाटील व प्रेम भोईर यांनी नृत्य साठी विशेष मार्गदर्शन केले. पथनाट्य नृत्य व समूहगीत साठी तालुका स्तरावर निवड झाली आहे.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. नामदेव म्हात्रे सर, शिक्षिका सौ. अलका गांधी व सौ.दिपाली पाटील शाळेत नवीन उपक्रम, तसेच वेगवेगळे शिबीर आयोजित करून शाळा नेहमीच उत्तम कामगिरी करीत असल्यामुळे सर्व स्थरातून शाळेचे विशेष कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Discussion about this post