बाबूराव बोरोळे जिल्हा प्रतिनिधी लातूर 8788979819लोहारा:उदगीर तालुक्यातील हेर येथील शेतकरी विलास कांबळे यांच्या शेतामध्ये हरभरा आणि ज्वारी रब्बी पिकांसाठी विशेष शेतीशाळेचे (दि.25 /12/2024 रोजी बुधवारी आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात कृषी पर्यवेक्षक सुनील चव्हाण यांनी शेतकऱ्यांना विविध तांत्रिक माहिती देत रब्बी हंगामातील पिकांच्या व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.तर शेतीशाळेत हरभरा व ज्वारी या पिकांचे योग्य प्रकारे उत्पादन घेण्यासाठी लागणारी जमिनीची निवड, बियाण्याची प्रक्रिया, पेरणीची योग्य पद्धत, खते व कीड नियंत्रण यावर चव्हाण यांनी सखोल माहिती दिली.
रब्बी पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.कार्यक्रमात कृषी सहाय्यक आम्रपाली ससाणे यांनी पिकांसाठी योग्य कीटकनाशके व जैविक खतांचा वापर कसा करावा, यावर मार्गदर्शन केले.
कृषी मित्र जगन्नाथ कांबळे यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात नवनवीन शेतीतंत्र वापरण्याचे महत्त्व पटवून दिले. माजी उपसरपंच कुमार घोगरे यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत शेतीशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.या शेतीशाळेस शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शंका विचारत कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.
या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शेतीशाळेने शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला असून उत्पादनवाढीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कृषी सहाय्यक आम्रपाली ससाणे यांनी केले.—फोटोउदगीर तालुक्यातील हेर येथील शेतकरी विलास कांबळे यांच्या शेतातील शेतीशाळेत मार्गदर्शन करीत असताना कृषी पर्यवेक्षक सुनील चव्हाण, कृषी सहाय्यक आम्रपाली ससाने व इतर.छायाचित्र बाबूराव बोरोळे डिगोळकर
Discussion about this post