कळवण प्रतिनिधी-रमेश गवळी
आज दिनांक २६/१२/२०२४ वार गुरूवार रोजी मार्गशीर्ष वद्य एकादशीच्या पावन तिथि नुसार संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराजांची पुण्यतिथी कॉम्रेड उदाराम तुळशीराम देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजाड या विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री जगताप सर यांच्या हस्ते देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर यशवंतराव महाराजांची आरती म्हटली गेली. सन्माननीय मुख्याध्यापक जगताप सर, अहिरे सर, खैरनार सर, यांनी देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर विद्यालयाच्या ग्रंथपाल श्रीमती सोनवणे मॅडम यांनी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचे अनेक, दैवीगुण व गुणवैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना सांगितले. त्यामध्ये जेव्हा बागलाण तालुक्यात १८७०/७१ च्या दरम्यान भीषण दुष्काळ पडला, त्यावेळी भुकेने व्याकुळ असलेल्या जनतेचे हाल देव मामलेदार यशवंतराव महाराज पाहू शकले नाही, महाराजांनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता सरकारी खजिना गोरगरिबांसाठी, भुकेल्यांसाठी रिता केला. ब्रिटिश सरकारला जेव्हा याची कुणकुण लागली, तेव्हा ते अधिकारी खजिना तपासणीसाठी आले असता तिजोरीमध्ये त्यांना तो खजिना जसाच्या तसा दिसला, आणि संपूर्ण बागलाणवासीयांना यशवंतराव महाराजांच्या देवत्वाचा साक्षात्कार झाला, आणि त्यांनी देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या नावाचा जयजयकार केला, हा प्रसंग अतिशय सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर कथन केला,परोपकार हाच खरा परमार्थ आहेहे समजून सांगताना स्वतःच्या आत झाकून माणसातला ईश्वर शोधला पाहिजे. माणुसकी, परोपकार, सदाचार, नम्रता, दयामाया, आपण किती जपतो, याचे चिंतन करून, गरजवंतांची मदत केली पाहिजे, अध्यात्माच्या वाटेवर चालले तर ईश्वराला जास्त आनंद होतो, हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, म्हणून देव मामलेदार यशवंतराव महाराजांच्या ह्या गुणवैशिष्ट्यांमधून *परोपकार हा एक गुण तरी आपण घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले यावेळी विद्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता, यामध्ये सन्माननीय मुख्याध्यापक श्री. बी. एन जगताप, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. आर जगताप, कलाशिक्षक श्री गांगुर्डे सर, सन्माननीय श्री, सोनवणे सर, भरसट सर, गवळी सर, गावित सर, अहिरे सर, खैरनार सर, बोरसे सर, सरोदे सर,देवरे सर, बिरारी सर, भामरे सर, सांस्कृतिक प्रमुख श्रीमती गोसावी मॅडम, वाघ मॅडम, पाळेकर मॅडम, कोर मॅडम, जगताप मॅडम, मोरे मॅडम, च गायकवाड भाऊसाहेब, चिंचोले भाऊसाहेब, माळी मामा ,संदीप देवरे, कोरमामा आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते, अतिशय उत्साहाने संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराजांची पुण्यतिथी आपल्या विद्यालयात साजरी केल्याबद्दल सन्माननीय मुख्याध्यापक श्री बी एन जगताप सर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या
Discussion about this post