- व्यवसायात नुकसान होवून कर्जबाजारी होणे गुन्हा ?
- वसुलीसाठी एजंट शिवीगाळ, दमदाटी करू शकतात ?
- बँक मॅनेजर, वसुली अधिकारी, कर्मचारी सर्वश्रृत का?
- महिलेला दमदाटी करून इज्जत काढू शकतात का?
- महिलांना कायदेशीर कार्रवाईची धमकी दिली जाते ?
खोपोली / मानसी कांबळे :- महिलांच्या विकासासाठी…महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज देण्याचा निर्णय घेतला आणि देशातील कोट्यवधी महिला व त्यांच्या बचत गटांना कर्ज देण्यात आले. परंतु महिला स्वावलंबी बनविता बनविता त्यांची इज्जत काढण्याचा परवाना बँक मॅनेजर, बचत गटांवर नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी तसेच कर्ज व हप्ता वसुली अधिकारी यांना मिळत असल्याचे दिसून येत आहे. बचत गटाचा हफ्ता भरला नाही म्हणून एखाद्या महिलेला दमदाटी, शिवीगाळ करून गल्लीत अथवा बचत गटाच्या मिटींगमध्ये अपमानित करणे…हप्ता भरला नाही म्हणून सर्व महिलांना नोटीस पाठवू…त्यांना यापुढे कोणतेच कर्ज मिळू देणार नाही, अशी धमकी बचत गटांवर नियंत्रण ठेवणारे व कर्ज, हप्ता वसुली अधिकारी देत असल्याचे दिसून येत आहे.
एखाद्या महिलेने व्यवसायासाठी कर्ज घेतले…आणि काही महिने हप्ता भरल्यानंतर सदर महिलेवर कर्ज झाले…व्यवसायात नुकसान होवून महिला व तिचे कुटुंब कर्जबाजारी झाले आणि ते दर महिन्याला महिला बचत गटाचा हप्ता भरू शकत नसेल तर ‘त्या’ महिलेकडून पैसे वसुलीसाठी महिला एजंट…बचत गटांवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी व कर्मचारी, बँक मॅनेजर ‘त्या’ महिलेची गल्लीत अथवा बचत गटाच्या मिटींगमध्ये इज्जत काढू शकतात का? त्या महिलेला उपस्थित बचत गटाच्या महिलासमोर अपमानित करू शकतात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मराठी व हिंदीतील नामाकींत वृत्तपत्र चालविणाऱ्या खोपोलीतील एक महिला व तिचे कुटुंब व्यवसायात नुकसान झाल्याने कर्जबाजारी झाले आहे. नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी…व्यवसाय वाढविण्यासाठी…डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. डोक्यावर लाखों रुपयांचे कर्ज असल्याने दर महिन्याला महिला व तिच्या कुटुंबाला बचत गट अथवा इतर बँक, मायक्रो फायनान्स कंपनी यांचा ईएमआय, बँकेचा हफ्ता भरणे शक्य होत नाहिये… टेन्शनमुळे महिला आजारी पडली आहे. अशा परिस्थितीत बचत गट वसुली महिला एजंट…बचत गटांवर नियत्रण ठेवणारे अधिकारी व कर्मचारी, बँक मॅनेजर ‘त्या’ महिलेची गल्लीत अथवा बचत गटाच्या मिटींगमध्ये इज्जत काढत असतील तर अशा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्रवाई होणार नाही का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, याबाबत बोलतांना अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (एबीजेएफ) रायगड जिल्हाध्यक्ष पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव म्हणाले की, आर्थिक अडचणी किंवा व्यावसायिक नुकसानीमुळे एखादी महिला व तिचे कुटुंब कर्जबाजारी झाले असेल आणि बचत गटाचा ईएमआय, बँक हफ्ता भरू शकत नसेल आणि तिला महिला एजंट…बचत गटांवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी व कर्मचारी, बँक मॅनेजर दमदाटी, शिवीगाळ करीत असतील किंवा गल्लीत अथवा बचत गटाच्या मिटींगमध्ये अपमानित करीत असतील…
ती महिला हफ्ता भरत नाही म्हणून गटातील इतर महिलांना वेठीस धरत असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री, आरबीआय बँकेकडे लेखी तक्रार करून अशा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्रवाई करण्याची मागणी करण्यात येईल. त्याप्रमाणे या उर्मट अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्रवाई करण्यात आली नाही तर अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (एबीजेएफ) च्या माध्यमातून कर्जत प्रातांधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (एबीजेएफ) रायगड जिल्हाध्यक्ष पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव यांनी दिला आहे.
Discussion about this post