डोणगाव :- केंद्र शासनाच्या डिजिटल पब्लिक फार अग्रीकल्चर अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात ॲग्रीस्टॅक प्रकल्प राबविण्यात येत आहे, या प्रकल्पात शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी देण्यात येणार आहे. शासनाने पीककर्ज, ई- पिकपाहणी, शेतमाल विक्री, पिक विमा, ऋषी विभागाच्या योजना, अतिवृष्टी,पुर, गारपीट, नैसर्गिक आपत्ती आदी योजना साठी
फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु स्थानिक तलाठी, ग्रामसेवक संघटनेने सदर कामं करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. परंतु केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार) गटाचे नेते प्रशांत पाटील यांनी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व ॲग्रीस्टॅक प्रकल्पाचे काम जिल्यातील सी.एस.सी. सेंटर धारकांना द्यावे अशी मागणी केली आहे.
ॲग्रीस्टॅक प्रकल्पा अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना स्वयं नोंदणी करण्यासाठी सोय केलेली होती. परंतु सध्या ती सुविधा बंद आहे. तलाठी, ग्रामसेवकांची काम करण्याची इच्छा नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या योजनेचा गाभा असलेली फार्मर आयडी प्राप्त न झाल्यास शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती पासून मुकण्याची शक्यता आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रशांत पाटील यांनी नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन सदर प्रकल्पाचे काम जिल्ह्यातील सी. एस.सी. धारक तरुणांकडे द्यावे अशी मागणी केली.
Discussion about this post