जळगाव (गाळणे)
आज या कलयुगात जेव्हा कोणीही कोणाला एक रुपया सुद्धा सोडत नाही आणि त्यातही फुकटाचे चे काही मिळाले तर काही लोकांना जास्तच आनंद होतो .परंतु ह्याला अपवाद ठरले श्री प्रताप किसन गेंद जळगाव गाळणे येथील सदृहस्थ. पंधरा दिवसांपूर्वी साप्ताहिक अर्थविश्वचे संपादक आणि सुप्रसिद्ध लेखक डॉ व्यंकटेश वसंतजी मारू हे आघार वरून रावळगाव जाताना रस्त्यात त्यांचे पैशाचे पाकीट मागच्या खिशातून स्पीड ब्रेकर वर गाडी उधळल्याने खाली पडले. परंतु त्यांच्या ते लक्षात आले नाही त्यात अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्र होती साधारणता दोन हजार रुपये होते एटीएम कार्ड होतं ,गाडीचा आरसी बुक होतं आणि त्यांचे व्हिजिटिंग कार्ड होते.
काही दिवसानंतर त्याच रस्त्याने एक वयोवृद्ध व्यक्ती जात असताना त्यांना ते पाकीट रस्त्यात पडलेले सापडले त्यांनी ते पाकीट उचलले आणि त्यात असलेल्या पैशांचा मोह न बाळगता त्यातील कागद पत्र महत्त्वाचे आहे याची जाणीव ठेवून त्यांनी डॉ. व्यंकटेश मारू यांना फोन लावला आणि सांगितले की तुमचे पाकीट रस्त्यावर सापडलेले मिळाले आहे .आपण कधीही येऊन घेऊन जाऊ शकतात. जर या ठिकाणी दुसरी कोणी भामटी व्यक्ती राहिली असती तर त्या पाकीट मधील दोन हजार रुपये काढून घेतले असते आणि खाली पाकीट फेकून दिले असते .परंतु पैशाचा मोह न बाळगता श्री प्रताप किसन गेंद यांनी जी माणुसकी दाखवली ती खरोखर लोकांकरता प्रेरणादायी आहे. जेव्हा पाकीट घेण्यास डॉ. मारू त्यांच्याकडे जळगावला गेले तर त्यांनी एकच गोष्ट सांगितली की रोजचे चार-पाच हजार रुपये कष्टाचे तर मला पुरतात, हरामाचे पैसे काय पुरतील या चांगल्या भावनेने मी आपणास फोन लावला. खरोखर ही घटना हृदयस्पर्शी आहे आणि या घटनेवरून एकच गोष्ट लक्षात येते की आज कलियुगातही माणुसकी जिवंत आहे.
Discussion about this post