*माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने अभिवादन* गडचिरोली – आदिवासी एकता युवा समिती गडचिरोली च्या वतीने भगवान बिरसा मुंडा चौकात देशाचे १३ वे प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना दि. २८/१२/२०२४ ला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी झालेल्या छोट्याश्या कार्यक्रमात माजी जि. प. सदस्य कुसूम आलाम, संघटनेचे अध्यक्ष उमेश ऊईके, सचिव प्रदिप कुलसंगे, संतोष भांडेकर, यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या जिवनावर प्रकाश टाकून त्यांनी आपल्या आयुष्यात कोणकोणते कार्य केले व देशाच्या विकासासाठी कोणते महत्वाचे कार्य व काम केले याबद्दल माहीती दिली.
सदर कार्यक्रमाचे संचालन अमोल कुळमेथे तर आभार आरती कोल्हे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता समितीचे संजय मेश्राम, सुधीर मसराम, अमोल कुळमेथे, प्रफुल कोडाप, आरती कोल्हे, सुनिता उसेंडी, निलेश आत्राम, निलेश कोडापे, संतोष भांडेकर,
प्रदिप वडेट्टीवार, श्यामराव हजारे, सुभेदार अंबादे, सतिश पैगनकर, भिमराव भैसारे, संघर्ष फुलझेले, गुरूदेव भांडेकर, संजय भोयर आदि नागरिक या अभिवादन कार्यक्रमास उपस्थित होते.*✍🏻प्रतिनिधी: प्रविण डी कोवाची**9637165828**🔖Tag: pravin D kowachi*
Discussion about this post