वेंगुर्ले, ता. २८: कै. श्रीकांत सरमळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
साधुन म्हापण येथील केंद्र शाळा नंबर १ मध्ये म्हापण गावातील ६ प्राथमिक शाळा व ७ अंगणवाडीतील एकूण १७५ मुलांना सरमळकर यांच्या कुटुंबियांच्या हस्ते मोफत दप्तर वाटप कार्यक्रम केंद्र शाळा म्हापण नं१ मध्ये करण्यात आले.
यावेळी म्हापण सरपंच आकांक्षा चव्हाण, हरि शास्त्री, रुची सरमळकर, निकी सरमळकर, स्नेहा सरमळकर, उपसरपंच सुरेश ठाकूर, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ मडवळ, माजी शिक्षण व आरोग्य सभापती विकास गवंडे, ग्रामपंचायत सदस्या सिया मार्गी, प्रशांती कोनकर, सुषमा म्हापणकर, तन्वी चौधरी, प्रदिप गवंडे, सिद्धेश मार्गी, खवणे प्राथमिक शाळा मुख्याध्यापक महेश परुळेकर, केंद्र शाळा म्हापण नं१ च्या शिक्षिका अश्विनी गायकवाड, रोहिणी हांडोरे अंगणवाडी सेविका अर्पिता कांदळकर, खवणे अंगणवाडी सेविका सुप्रिया खोत, चव्हाणवाडी अंगणवाडी सेविका मानसी चव्हाण आदींसह अंगणवाडी सेविका, मदतनीस, विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रघुनाथ उर्फ दाजी जुवाटकर यांनी मानले.
Discussion about this post