रवींद्र पवार
शिरूर तालुका प्रतिनिधी
बंजारा समाजाची काशी असलेले पोहरागड येथील महंत व गोर बंजारा समाजाचे धर्मगुरू मा.श्री शेखर महाराज यांचे पुण्यामध्ये आगमन झाले असता तिसरो दळ गोर बंजारा समाज ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने शेखर महाराज यांचे स्वागत करून सन्मान करण्यात आले.यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रवींद्र पवार,संजय चव्हाण,शांताराम पवार,एकनाथ राठोड,उमेश राठोड,प्रकाश राठोड,ज्ञानेश्वर भाऊ जाधव,दादा राठोड,संतोष पवार,देविदास राठोड,देवराव चव्हाण,सुनील राठोड, नामदेव राठोड,गजानन राठोड व इतर सर्व पदाधिकारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खांदवे नगर वाघोली येथे संजय भाऊ चव्हाण यांच्या घरी अल्प आहार व स्वागत सत्कार घेतल्याच्या नंतर शेखर महाराज हे रांजणगाव जवळ असलेल्या खंडाळा माथा गणेगाव येथे भाऊराया क्रांतिकारी सद्गुरु सेवालाल महाराज मंदिर येथे दर्शनासाठी गेले असता तेथेही भाऊराया सद्गुरु सेवालाल महाराज यांना भोग भंडारा लावून तेथे उपस्थित असलेल्या सर्व गोर बंजारा बांधवांना व्यसनमुक्त व्हा,मुक्या प्राण्याची हत्या टाळा,शाकाहारी बना,सर्वजण मिळून मिसळून एकत्र उपक्रम राबवावे,एकत्र राहा व हिंदू धर्माचे व बंजारा धर्माचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आयुष्य व्यथित करा,मुलांना शिक्षणासाठी प्रेरित करा,भुकेलेल्या अन्न,तहानलेल्या पाणी,वाट चुकलेल्यां ना वाट दाखवा हा सद्गुरु सेवालाल महाराजांचा मूळ मंत्र दिला महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून गोर बंजारा समाज येथे नोकरी निमित्त पोट भरण्यासाठी बिगारी काम करण्यासाठी आलेला आहे तरी सर्वांनी मिळून मिसळून एकत्र नांदावे असा गुरु मंत्र बंजारा समाजाचे महंत शेखर महाराज यांनी आपल्या अमोल वाणीतून येथे उपस्थित असलेल्या गोर बंजारा समाजाला दिला आहे तसेच शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन महंत शेखर महाराज यांचा सन्मान करण्यात आला आहे.
Discussion about this post