सर्वसामान्य प्रवाशांची लालपरी आता हायटेक होताना दिसत आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्याच्या दृष्टीने लालपरीने ऍप ची निर्मिती केली असून ‘MSRTC’ असे या ऍप चे नाव आहे. हे ऍप प्रवाशांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईल वर ऍप स्टोअर मधून डाउनलोड करून घ्यायचे आहे. या ऍप च्या मदतीने बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशाला आपल्याला हवी असलेली बस ची अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे यासंदर्भात सांगली विभागाचे नियंत्रक सुनील भोकरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले आमच्या या प्रणालीचा वापर काही महिन्यांपासून सुरु आहे ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम’ प्रणाली हि फक्त आमच्या कार्यालयापुरती मर्यादित होती. मात्र आता बसेस ना बसवण्यात येत आहे यामुळे बस चे लोकेशन समजू शकते. अजूनही सध्या पूर्ण क्षमतेने या प्रणालीचा वापर नसला तरी भविष्यामध्ये सर्व बस ना हि प्रणाली जोडली जाणार आहे यामुळे प्रवाशांना खूप मोठी सुविधा मिळणार आहे. मात्र यासाठी प्रवाशांकडे अँड्रॉइड मोबाईल आवश्यक आहे. अजून जिल्ह्यातील निम्म्या बस ना हि सुविधा जोडली गेली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले ते पुढे म्हणाले कि या ऍप द्वारे तिकिटांचे आरक्षण बस चा मार्ग बस चे लोकेशन ट्रॅकिंग गाडीत झालेला बिघाड तसेच दुर्दैवाने अपघात झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यास मदत होईल. प्रवाशांना आता एखाद्या बस साठी वाट पहाता स्थानकावर थांबण्याची आवश्यकता नाही बस कोणत्या वेळी स्थानकात पोचेल हे या ऍप च्या मदतीने समजणार आहे.
Discussion about this post