मिरज विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार कै प्रा शरद पाटील यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त मिरज येथील मिरज महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या जिल्ह्यातील वाढत्या रक्ताच्या तुटवड्यामुळे मिरज महाविद्यालयाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले या शिबिरामध्ये मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन कोळी, सोहेल भाई, उद्योजक कुकरेजा, महाविद्यालयाचे प्रा गुरु सर यांच्यासह शेकडो रक्तदात्यांनि रक्तदान केले या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. माजी आमदार कै प्रा शरद पाटील यांचे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान असामान्य होते. त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींचा शिक्षणासाठी यशवंत शिक्षण संस्थेची उभारणी केली आज हजारो विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जात असलेल्या महाविद्यालयांमधून शिक्षण घेत आहेत.
Discussion about this post