हातकणंगले -29 डिसेंबर 2024:
शिरोली ते सांगली महामार्गावर बेकायदेशीर डिव्हाडर खोदल्यामुळे रस्ते अपघातात लक्षणीय वाढ झाली आहे, रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या किंवा शॉर्ट कट मारता यावा यासाठी काही स्थानिक नागरिक किंवा व्यावसायिक हे आपला व्यवसाय व्हावा या उद्देशाने बांधण्यात आलेले दुभाजक हे काढून बेकायदेशीर डिव्हाडर तयार केले आहेत. ज्यामुळे हे बेकायदेशीर डिव्हाडर हे असंख्य अपघातांचे कारण बनले आहेत.
गेल्याच आठवड्यामध्ये हातकणंगले येथील रहिवाशी असलेले आशुतोष कांबळे हे रोजच्या प्रमाणे कामावर जात असताना अशाच एका बेकायदेशीर डिव्हाडरमुळे त्यांचा अपघात झाला. ज्यामुळे आशुतोष यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या पश्चात ६ वर्षाचा मुलगा आणि ११ महिन्यांची लहान मुलगी आहे.आशुतोष कांबळे यांच्या अपघाती निधनाने त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे. यास जबाबदार बेकायदेशीर डिव्हाडर करणारा आहे कि आशुतोष याला अपघात करणारा वाहन चालक कि प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर ?? असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून निर्माण होत आहे .
स्थानिक प्रशासन, स्थानिक पोलीस व प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर यांनी तात्काळ असे अपघात होऊ नयेत म्हणून संबंधितांवर त्वरित कारवाई करून असे बेकायदेशीर डिव्हाडरांचा बंदोबस्त करावा व शिरोली ते सांगली महामार्गावरील रस्ता सुरक्षा उपायांचा सखोल आढावा घ्यावा अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि प्रवासी करत आहेत. बऱ्याच जणांचा असा विश्वास आहे की योग्य चिन्हे, रात्रीच्या वेळी चांगली रोषणाई आणि अधिक सखोल वाहतूक व्यवस्थापन योजना भविष्यातील अपघात टाळू शकतात.

Discussion about this post