
देवाच्या मंदिरा पेक्षा ज्ञानाच्या मंदिराला जपा
ज्ञानाच्या मंदिरातून उद्याची भावी पिढी निर्माण होते.
म्हणून देवाच्या मंदिरा पेक्षा ज्ञानाच्या मंदिराला जपा असे प्रतिपादन.
डॉ. भारत मगदूम (सेवानिवृत्त सहाय्यक पशुधन विकास अधिकारी) यांनी केले.
कन्या विद्यामंदिर चिखली या शाळेच्या भौतिक सोयी सुविधेसाठी रोख रक्कम ₹ 5000 अक्षरी रुपये पाच हजार रुपये शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब कांबळे यांचे कडे सुपूर्द करताना ते बोलत होते.

तसेच कन्या विद्या मंदिर ची माजी विद्यार्थिनी कुमारी प्रतिभा शिवाजी गळतगे हिची इंडियन आर्मी मध्ये CISF पदी निवड झालेबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक स्टाफ यांच्या वतीने करण्यात सत्कार करण्यात आला.
यावेळी दोन्ही मान्यवरांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.वरूण गुरव व श्री.समीर नदाफ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री.अमित शिंदे व सदस्या सौ.रुपाली कुंभार, सौ.सारिका निलजे. शिक्षिका सौ.सुजाता पाटील,शिक्षक वैभव टोणपे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री.बाबासाहेब कांबळे यांनी केले.
आभार श्री.सुनील शिंत्रे यांनी मानले…
Discussion about this post