वाळुज महानगर – वाळूज औद्योगिक परिसरातील सामाजिक,शैक्षणिक,साहित्य, कला, संस्कृतीत, राजकीय, धार्मिक, सहकार उद्योग क्षेत्रात सातत्याने भरीव कामगिरी बजावत असलेले गुरुकुल वरिष्ठ महाविद्यालय रांजणगावचे संस्थापक अध्यक्ष,यशश्री प्राथमिक व माध्यमिकचे मुख्याध्यापक तथा मुप्टा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण हिवाळे यांना 14व्या झेप साहित्य संमेलनाच्या औचित्याने शैक्षणिक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रा.लक्ष्मण हिवाळे यांनी सामाजिक शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अनेक तरुण रोजगाराभिमुख बनविण्यासाठी मोलाच योगदान देत आहेत. लवकरच सदरील राज्यस्तरीय पुरस्कार एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराच्या निवडीबद्दल मुप्टा शिक्षक संघटनेचे प्रा.सुनील मगरे तथा प्राचार्य संचालक डॉ.योगेश दवंडे,संस्थापक किशन शिंदे, अडव्होकेट शिवराम मस्के,कृष्णाजी दाभाडे,उमेश डावखर,शहाजी भुकन,राधाकृष्ण बिघोत,समाधान हराळ,कुमार बिरदवडे,अविनाश सोनटक्के,गणेश जाधव,पंकज महामुनी, न्यू यशश्री विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप वाघ, स्पिरिट इंटरनॅशनल कॉलेजच्या संध्या जाधव यासह आदींनी अभिनंदन व गोड कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post