आजरा: प्रतिनिधी
येथील आजरा हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका सुप्रिया रामचंद्र कांबळे यांनी इयत्ता पाचवी ते आठवी शिष्यवृती परीक्षा तसेच एन एम एम एस परीक्षा विद्यार्थी यांना उत्कृष्ठ मार्गदर्शन केले बाबत मानपत्र देवून सन्मानित करणेत आले या कार्यक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष, श्री. अशोक चराटी, सीईओ श्री. डॉ. अनिल देशपांडे मुख्याध्यापक, होलमसर, उपमुख्याध्यापक तोडकरसर, पर्यवेक्षिका, कामत मॅडम यांच्या उपस्थितीत मानपत्र देवून सुप्रिया रामचंद्र कांबळे यांना सन्मानित करण्यात आले.
या मानपत्राचे मानकरी होण्यासाठी त्यांनी केलेली कामगिरी आणि सर्वस्व अर्पण करून विद्यार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन देवून शिष्यवृत्ती, एन एम एम एस परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारा शिक्षक समाजातील भावी पीढी घडविण्याचे काम करणे. येणाऱ्या भावी पीढीला घडविण्याचे कार्य व स्पर्धा परिक्षामध्ये सामोरे जाण्यासाठी अशा मार्गदर्शनाची गरज आहे.
आर्थिकदृष्या मागास विद्यार्थ्यांसाठी साठ हजाराची शिष्यवृती अशा मोठ्या रकमेची मिळवून देण्यास अशा या शिक्षिकेचा मोलाचा वाटा आहे. आपले सर्वस्व,तन, मन, धन, अर्पण अहोरात्र कार्य केले.
विद्यार्था, शाळा, समाज यांची सेवा केली आहे. याची दखल घेवून अशा या मार्गदर्शक शिक्षिकेला ‘मानपत्र ‘ देवून सन्मान करणेत आला.
Discussion about this post