माझ्या सर्व आंबोली, चौकूळ, इसापूर, तेरवण, पारगड मधील नागरिकांना आव्हान करत आहोत, की
दिनांक 31/12/24 रोजी आंबोली – चौकूळ मार्गे बेळगाव, चंदगड अशी बससेवा उपलब्ध व्हावी. जेणेकरून ह्या गावातील हजारो नागरिकांना, शेतकऱ्यांना, विध्यार्थी, आणि पर्यटक, व्यावसायिक, आणि तालुका, जिल्हा येथील शासकीय कामकाज, आरोग्य, आणि विविध कामे सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दोडामार्ग अशा ठिकाणी असतात. आणि ह्या कामासाठी लागणारा वेळ, आणि पैसा खूप खर्चिक आहे. ओरोस सारख्या ठिकाणी काम असल्यास ह्या नागरिकांना 3 /3 दिवस लागतात.
त्यामुळे आम्ही ह्या तुमच्या मागणीचा विचार करून संबंधित अधिकारी, आणि प्रशासन यांना विनंती करून झाली. पण आमच्या मागणीकडे एस्टी महामंडळ अधिकारी, विभाग नियंत्रक जाणूनबुजून टाळाटाळ करत आहेत. आणि ह्या साठी
आम्ही लोकशाही च्या मार्गाने एकदिवस लाक्षणिक उपोषणास बसणार आहोत. आणि शासन दरबारीं आमच्या मागणी पोहचावी. म्हणून एकदिवस आंदोलन करत आहोत.
आंदोलन सकाळी 10 :30 वाजता सुरु होईल आणि संध्याकाळी 5 वाजता संपेल.
तरी नागरिकांना आव्हान करत आहोत की आपण बहुसंख्य उपस्थिती दाखवावी. ही विनंती
स्थळ आंदोलन ठिकाण
आंबोली – चौकूळ तिठा.
एक दिवस लाक्षणिक उपोषण आहे.
कळावे
आपला
श्री दत्ताराम विष्णू गांवकर
श्री निखिल राऊळ
श्री सुदेश कडव
श्री सत्यवान भोसले
श्री तुकाराम गवस
आणि आंबोली, चौकूळ, तेरवण, इसापूर नागरिक, विध्यार्थी वगैरे
Discussion about this post