19 Total Views , 1 views today
हदगाव / . हदगाव हिमायतनगर विधानसभेत विक्रमी मताधिक्या ने निवडून आल्यानंतर आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवण्यास सुरुवात केली आहे. आधीचे आमदार विधिमंडळात कधी बोलले याचा कुठलाही व्हिडिओ किंवा संभाषण या मतदारसंघात ऐकावयास मिळाला नव्हता. परंतु आमदार कोहळीकर यांनी नागपूर येथील अधिवेशनात महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले शेतकऱ्यांच्या बाबतीत उपस्थित केलेल्या मुद्दे व अतिशय महत्त्वपूर्ण ठरले आहेत तो. महत्त्वपूर्ण धागा पकडून आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सभागृहात लक्षवेधी उपस्थितीत केली त्यामुळे आपण योग्य माणसाला मतदान करून निवडून आणल्याचे समाधान नागरिकांनी जाहीरपणे बोलून दाखविले सद्यस्थितीत पैनगंगा कोरडी पडली असल्याने पैनगंगेवरील पाणीपुरवठा नळ योजना बंद पडणार की काय ?
अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली पाळीव प्राणी वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर स्वरूपात निर्माण झाला .अशा अवस्थेत पैनगंगेत पाणी सोडणे अनिवार्य ठरत होते .अखेर आमदार कोहळीकर यांनी ही निकड हेरून जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्र पाठवून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली नदीकाठावरील ग्रामपंचायतच्या वतीने उपरोक्त प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे ठरावही पाठविण्यात आला होता. आमदार कोहळीकर यांच्या प्रयत्नातून आता 2.50 दस लक्ष घनमीटर पाणी पैनगंगेत सोडण्यात येणार आहे तर सन 2024- 2025 चे पाणी आरक्षण दशलक्ष घनमीटर 17.24 असे असून यापैकी 2.50 दशलक्ष घनमीटर पाणी पैनगंगे सोडल्यानंतर 14.74 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा प्रकल्पात शिल्लक राहणार आहे.
पैनगंगेत पाणी सोडल्यानंतर हदगाव तालुक्यातील बेलमंडळ ,ईरापूर करोडी ,पेवा, उंचेगाव ,खुर्द साप्ती, हरडफ ,मनुला ,गुरफळी बाभळी, मनूला बुद्रुक गोजेगाव वाकोडा, बेलगव्हाण ,कोथळा वाकी, मनुला, उंचेगाव,शिखर, माटाळा ,भानेगाव इत्यादी तर हिमायतनगर तालुक्यातील घारापुर, मंगरूळ ,डोलारी, पळसपुर ,कौठा ,एकंबा, वारंगटाकळी ,दिघी ,शिरपल्ली शेलोडा ,कामारी ,बोरगडी ,धानोरा आदी गावांना थेट फायदा होणार आहे .आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपल्या कर्तव्यतत्परतेची चुणूक दाखवीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे मात्र जनतेतून विशेष कौतुक होत आहे.
Discussion about this post