वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा कणकवली येथे पार पडली. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यात तळेरे येथील वामनराव महाडीक विद्यालयाची “आये” ही एकांकिका शालेय गटातून सहभागी झाली होती. एकांकिकेचा विषय नावाप्रमाणेच जिव्हाळ्याचा आणि जुन्या आठवणी जाग्या करणारा होता. विद्यार्थ्यांनी देखील आपल्या उत्तम सादरीकरणाद्वारे प्रत्येकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.
तसेच उत्कृष्ट अभिनय (पुरुष) – कु. मयुरेश संतोष जठार हा प्रथम क्रमांकाचा ठरला व उत्तेजनार्थ अभिनय (स्त्री) – कुमारी – शमिका जयशंकर ढेकणे अशी वैयक्तिक बक्षीस संपादन करून विद्यालयचे नाव उज्वल केले.
या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य , शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळा समिती अध्यक्ष- पदाधिकारी व ग्रामस्थांतर्फे या दोघांसोबतच सर्व सहकलाकारांचे देखील कौतुक होत आहे.
Discussion about this post