ब्रेकिंग न्यूज…
कैलासराजे घरत
खारपाडा पेण
गेल्या 10 ते 15 वर्षांपासून किल्ले सांकशी येथे अनेक दुर्ग अनेक गडसंवर्धन संस्था गड स्वच्छता मोहीम राबवित आहेत त्यामध्ये राजा शिव छत्रपती परिवार मुंबई परिवार यांच्या माध्यमातून आम्ही विभाग प्रमुख निलेशदादा चव्हाण,उपविभाग प्रमुख
यतिश दादा करण यांच्या मार्गदर्शनाखाली २०१८ पासून गड स्वच्छता मोहीम राबवित आहोत. याच साठी केला होता अट्टाहास…एवढ्या वर्षांच्या गड स्वच्छता मोहिम मेहनतीचे चीज झाले..
आज दिनांक २९/१२/२०२४ रोजी सांकशी किल्ला येथे शिवप्रतिष्ठान यांची गड स्वच्छता मोहीम चालू असताना तेथील तलावामध्ये भगवान श्री शंकर महादेवाची पिंड, नंदी महाराज मूर्ती आणि देवीची मूर्ती सापडली आहे.खरंच सर्व दुर्ग सेवक मावल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.एवढ्या वर्षांच्या मेहनतीचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले.
आज साक्षी गड प्रत्यक्षात आपल्याशी बोलू लागलाय.. जपुया इतिहासाच्या पाऊलखुणा..
✍🏻दुर्गसेवक पत्रकार कैलासराजे घरत
मावळा राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र राज्य
Discussion about this post