तालुका प्रतिनिधि – समीर बल्की
चिमूर :- चिमूर तालुक्यातील नेरी पासून जवळच असलेल्या शिरपूर बोथली रोडवर शिरपूर गावाजवळ दुचाकी व बैलबंडी ची जोरदार धडक होऊन दुचाकीसवार जागीच ठार झाले.
सविस्तर असे कि बोथली येथील महेश माणिक सहारे वय वर्षे अंदाजे वीस ते बावीस हा तरुण आपल्या आईला घेऊन नेरी येथे केवायसी करण्यासाठी जात असतांना शिरपूर गावाजवळ अचानक शेतातून निघालेल्या बैलबंडीला धडक दिली धडक इतकी भीषण होती कि दुचाकी उसरून बरीच दूर गेली आणि तरुणाचे जागेवरच प्राण गेले. लागलीच पोलीस विभाग नेरीला भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आले असता पोलीस घटना स्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिमूर येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.
Discussion about this post