उदगीर/कमलाकर मुळे :
सरत्या वर्षाला निरोप देतांना मागे वळून पाहिले असता अनेक आठवणी, अनुभव, हानी,सुख दुःख,प्रगती, संधी, यांसारखे अनेक प्रसंग आठवणीत असतांना अचानक काहीसा चमत्कार होईल व नवीन वर्ष अधिक चांगले जाईल ही एकच भावना मनात राहून आपण सरत्या वर्षाला निरोप देतो वर्षे जरी बदलत असली तरी आपली मन विचार व रोजनीशी प्रयत्न, जो पर्यंत आपण बदलत नाही तो पर्यंत येणारा दिवस हा येत जाईल व जात जाईल
नवीन वर्ष म्हटल की आपणास खूप साऱ्या अपेक्षा ,आव्हान, नवीन संधी चालून येईल त्यात काही शंका नाही मात्र आपणास त्या साठी काही पाऊलही उचलावे लागतील ,काही संधी कमवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करावी लागेल ,नुसतीच अपेक्षा न ठेवता त्या प्रत्यक्षात आणावही लागतील
बघता बघता चालू वर्ष निरोप घेत असताना मी मात्र सरत्या वर्षाच्या मागोवा घेतांना मिळालेल्या संधी व प्रगतीचा पाढा वाचत होतो तसेच झालेल्या चुकांचाही विचार केला असुन भविष्यात चुका संधी हुकू नयेत यांसाठी ही चिंतन करत आहे या सरत्या वर्षाने मला भरभरून दिले खूप आनंदाने मी हे वर्ष घालवले
मात्र येणारा काळ वेळ आपल्या हातात नसली तरीही एक सकारात्मक विचाराने नक्कीच प्रत्येक दिवस आनंदीत जाईल हेही खरं आहे ,जीवनाची खरी सुरवात हि आपल्या सकारात्मक विचाराने झाली तर आपण येणारे प्रत्येक संकट आनंदाने धैर्याने घालवू चला तर मग काही संकल्प नव्या वर्षाचे आपण करत ते अमलात उत्स्फूर्तपणे आनू ,नवीन वर्षाची सुरवात ही मोठया उत्स्फूर्तपणे आपण साजरी करतो व काही काळानंतर तो संकल्प विसरून जातो मात्र काही संकल्प आपण जीवनात या अंगिकारले पाहिजे
संकल्प
*सातत्याने आपण कुठलंही संकट दुःख व आनंद असो तो नेहीमीच आनंदाने सामोरे जा
*नकारात्मक विचार व माणसे यांपासून स्वतः ला दूर ठेवण्याचा प्रयत्नशील रहा
*एकदा देव वाचवेल पण आपले कर्म आपणास वाचवणार नाही त्यामुळे चांगले कर्म, काम करा
*स्वतःला सतत कामात गुंतून ठेवा म्हणजे नकारात्मक विचार डोक्यात येणार नाही
*एकमेकांचा आदर करायला शिका
*सुख दुःख यात स्थितप्रज्ञ रहा
*गरिबीची थट्टा व मस्करी टाळा
*समाजातील गरजू लोकांना मदत करा
*आपल्या पेक्ष्या वयाने मोठी माणसे यांचा नेहमी आदर व आदर्श ठेवा
*नित्य आराधना करावी मग ती कुठल्याही देवाची, व्यक्तीची असो
*जीवनात सकारात्मक विचाराची पेरणी करावी
*वाचनाची आवड आपनास विचारशील बनवते
*निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करावा
*साधी राहणी व उच्च विचारसरणी जोपासावी
*दिवसभर व्यस्ततेतून वेळ काढून स्वतःसाठी जगावे
*संगीताची आवड आपणास आनंदी ठेवेल
*चांगल्या सवयी जोपासाव्यात
*प्रत्येक व्यक्ती कडून काही न काही चांगले घेता येते ते घेण्याचा प्रयत्न करावा
*मी पणाची समाप्ती व्हावी
*आनंदीत जीवन जगण्यासाठी काहीही खर्च नाही आपणास चांगले विचार आचार जोपासावी लागतील
सहकारी मित्र परिवार यांमध्ये चुका शोधण्यापेक्षा चांगली संधी गुण शोधा
*कामात व्यस्त असले की कोणतीही वाईट विचार डोक्यात येणार नाही
*स्वतःला लोभ आमिष यांपासून दूर ठेवा
*आठवढ्यातून एकदा तरी पायी चालण्याचा संकल्प करा
आजकाल आपण आपल्याकडे असणाऱ्या चांगल्या गोष्टी विसरून नसणाऱ्या गोष्टीचा विचार केल्याने आपण दुःखी असतो त्या मुळे सर्व काही असूनही आपण आपल्या असणाऱ्या गोष्टींवर विरजण घालतो , छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंद आहे तो आपण स्वीकारले पाहिजे कुणाला केलेली मदत ही पण आनंदाचा भाग आहे, निव्वळ आपण जगाला किती आनंदीत आहो हे दाखविण्यासाठी आपण खूप खर्च करतो व दुःखी जीवन जगतो , परमेश्वराणे आपणास चांगले शरीर, परिवार दिला आहे यापेक्षा मोठी कुठलीही संपत्ती मी मानीत नाही .गाडी घोडा येशोआराम, मोठं मोठाली घरे , यांकडे आपले लक्ष विचलित न करीत आपण असणारी आपली जिवाभावाची माणसं व गरजेपुरता असणारा पैसा तेच आपले खरे खुरे भांडवल आहे नुसती मरमर करून आपण पैसा न जोडता आनंदीत जीवन जगण्यासाठी
वेळ, देऊन त्या जीवनाचा आनंदही घेता आला पाहिजे
येणारे वर्ष आपण एक संकल्प करू की माझ्या कडे जे आहे ते मी आनंदाने स्वीकारून जीवनाची नवी पहाट समजून आयुष्य जगीन
सर्वाना नवीन वर्ष मनाजोगे जगता यावे यासाठी शुभेच्छा.
Discussion about this post