प्रतिनिधी :- राजेंद्र टोपले
नविन वर्षे नविन आशा घेऊन येते. प्रत्येक जण येत्या वर्षांची वाट पाहत असतो. प्रत्येक वेळी आपण स्वतः ला अनेक आश्वासने देत असतो. पण या धावपळीच्या जीवनात हे सर्व आपण विसरून जातो आणि परतत्याच शर्यतीत पुन्हा पुन्हा अडकतो.
नवं वर्षे म्हणजे नविन सुरुवातीचा आनंदोत्सव. या दिवसांत आपण जुन्या वर्षाचा निरोप घेऊन नव्या वर्षाचे स्वागत करत असतो, ज्यामध्ये आशा, प्रेरणा, आणि नविन संकल्पाचा समावेश असतो. आपल्या जीवनातील प्रिय व्यक्तिंना शुभेच्छा देणे हा एक महत्वाचा भाग असतो. यांमध्ये नात्यांचा गोडवा आणि आनंदाचे नविन रंग भरण्याचे साधन असते. आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र परिवार, नातेवाईक आणि सहकाऱ्यांसाठी नववर्षाच्या शुभेच्छाची एक जणु काही बरसातच असते.
एक वर्ष म्हणजे तब्बल३६५दिवसांचा कालावधी उलटून गेल्यावर आपण आता नवीन वर्षात पदार्पण करत आहोत. गेल्या वर्षी आपण काय केले, काय नाही केले, मागे काय राहिले या सर्वांचा मागोवा घेऊन आपण नविन वर्षात काय करणार यांचे योग्यरित्या नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. नियोजन करतांना जास्तीत जास्त वेळ हा अवघड विषयांना दिला पाहिजे आणि उरलेल्या घटकांना नंतर वेळ द्या.एखाद्या प्रश्नांच उत्तर खूप मोठं होत तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर लहान हे सर्व धोके टाळण्यासाठी लेखनकौशल्ये विकसित करण्यासाठी काही वेळ राखून ठेवला पाहिजे. आपले भावी आयुष्य आपण एका सेकंदात बदलू शकतो. फक्त आपल्याला योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे असते. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच पण त्याला आपण कसे सामोरे जातो यावर ते सर्व अवलंबून असते. आपण व्यक्तिमत्वाचा एक भाग बनून आपण एक तणावमुक्त, आनंदी,आणि यशस्वी जीवन जगू शकतो.
कोणत्याही व कुठलीही परिस्थिती असो सर्वप्रथम आपण आपल्या आरोग्यावर लक्ष दिले पाहिजे. पहिले प्राधान्य आरोग्य या मुख्य घटकांवर दिले पाहिजे. आयुष्यात असे काही प्रसंग येत असतात की तेव्हा आपण काय करावे हे आपणास काही सुचत नाही. अशावेळी आपण योग्य निर्णय घ्यावा. तरीही आपल्याला काही समजत नसेल तर आपल्या जवळच्या मित्रांचा किंवा हितचिंतकांचा योग्य सल्ला घेतला पाहिजे.
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व स्वप्न साकार होण्याच्या जादूने आणि नविन सुरुवातीच्या सौंदर्याने भरलेल्या नविन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
चला या नविन वर्षाच स्वागत करुया,जुन्या स्वप्नांना, नव्याने फुलवूया नववर्षाभिनंदन!

Discussion about this post