उदगीर /कमलाकर मुळे :येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळला.या स्पर्धेत मुलांमध्ये नाशिक तर मुलींमध्ये नागपूरच्या संघाने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी क्रीडा मंञी तथा आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले.यावेळी देवर्जन येथील स्वातंत्र्य सैनिक शिक्षण संस्थेचे सचिव ओमप्रकाश साकोळकर,बस्वराज पाटील कौळखेडकर,तहसीलदार राम बोरगावकर,गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर,संघटनेचे राज्य सचिव चेतन पागावार,प्रा.डाॅ.बस्वराज धोतरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर रोडगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जानिमियाॅ,माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले,देवर्जनचे सरपंच अभिजीत साकोळकर,तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत लोदगेकर,लातूर जिल्हा लंगडी असोसिएशनचे सचिव तथा आयोजक जयराज धोञे अशोक बुकटे,सागर राऊत,नरेश जैस्वाल,उदय जाधव, अशोक परीट,आदी उपस्थित होते.आमदार संजय बनसोडे म्हणाले,क्रीडा संकुलावर मागील काळात कुस्ती,फुटबॉल व क्रिकेटसह अनेक खेळाच्या स्पर्धा झाल्या आहेत.भविष्यात लंगडी स्पर्धेला राजाश्रय मिळवून देणार आहे.क्रीडा मंञी असताना खेळाडुच्या हिताचेअनेक निर्णय घेतले असून मिशन लक्ष्यवेधमध्ये विविध क्रीडाप्रकार आहेत.क्रीडा विभागाचे रखडलेले विविध तीन वर्षांचे पुरस्कार पुण्यात वितरित केले.यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देण्याचा निर्णय क्रीडा मंञी असताना घेतल्याचे त्यांनी नमुद केले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण पोस्ते पोद्दार इंग्रजी शाळेचे संस्थापक सुरज पोस्ते यांच्या उपस्थितीत झाले.या स्पर्धेत मुलीमध्ये लातूर द्वितीय तर नाशिक संघ तृतीय क्रमांकावर राहिला.मुलांमध्ये मुंबई द्वितीय, कोल्हापूर संघाला तृतीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
Discussion about this post