कोरेगाव भीमा :सारथी महाराष्ट्राचा
कोरेगाव भीमा -पेरणे फाटा (ता. हवेली ) येथे 1 जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ शौर्यदिनी भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भीमसैनिकांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र त्याचबरोबर अशोकचक्र असलेला निळा ध्वज आणि जयभीम घोषवाक्य, अशी विशेष सजावट करण्यात येणार आहे. या सजावटीसाठी. बाटीचे संचालक, निबंधक तसेच जिल्हाधिकाऱ्यांची शासन मान्यता घेण्यात आली आहे. यंदा च्या शौर्यदिनी भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र जय भीम घोषवाक्य आणि निळा ध्वज असा अनोखा संगम ऐतिहासिक विजयस्तंभावर दिसणार आहे. यंदा विजयस्तंभाची सजावट भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून करण्यात आल्याचे कोरेगाव भीमा विजयरणस्तंभसेवा समिती अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, युवराज बनसोडे, विवेक बनसोडे यांच्यावतीने सांगण्यात आले. ऐतिहासिक विजयस्तंभावर करण्यात आलेली आकर्षक सजावट.
सारथी महाराष्ट्राचा
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
भिमदास नरवाडे, परमडोली
मोबाईल नंबर -7218366054
Discussion about this post