मेहकर ता.प्र. सुबोध आखाडे
डोणगांव:- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विकास पुरुष, भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ म्हणून राज्यभरात ओळखले जाणारे कर्मवीर सुबोधभाऊ सावजी माजी महसूल वस्त्रोद्योग, गृहनिर्माण राज्यमंत्री माझी पालकमंत्री अकोला,बुलढाणा जिल्हा यांचा ८० वा वाढदिवस अभिष्टचिंतन सप्ताह व लोकनेत्या सौ. सपना ताई सुबोध सावजी यांचा २५ वा पुण्यस्मरण कार्यक्रम दि. ३ जानेवारी २०२५ सपनाताई सावजी नगर डोणगाव येथे संपन्न होणार असून
सप्ताहात कार्यक्रमांची मेजवानी डोणगावकरांसाठी असणार आहे .
दि 3 जानेवारी सकाळी राहते घर ते मंडपापर्यंत मिरवणूक नंतर अभिष्टचिंतन व प्रख्यात कव्वाल मुस्तफा अजीज नाज यांचा कवाली चा कार्यक्रम सायं. ६ वाजता,०६ जानेवारी श्री. १०८ मानतुंगाचार्य कृत श्री. भक्तामर पाठ. राहते घरी सादरकर्ते: जिनवानी महिला व पुरुष जैन मंडळ डोणगांव स. १० वा,आयु.कडूबाई खरात यांचा दुपारी. ४ वा यांचा भीम गीतांचा कार्यक्रम, दि.०७ जानेवारी श्री. स्वामी चरित्र सारामृत पारायण राहते घरी सकाळी १०वा. , ह.भ.प.श्री. पुरषोत्तम पाटील महाराज दु. ४ वा , दि.०८ जानेवारी गजानन महाराज लहान पोथीचे पारायण राहते घरी सकाळी १०वा , ह.भ.प.श्री. इंदुरीकर महाराज दि.०८ जानेवारी दु. ०४ वा. अश्याप्रकारे अभिष्टचिंतन सोहळा सप्ताह निमित्त विविध सांस्कृतिक उपक्रमांची मेजवानी मेहकर विधानसभा मतदारसंघातील जनतेला मिळणार आहे या अभिष्टचिंतन सोहळ्याची तयारी श्री. सुबोधभाऊ सावजी मित्र मंडळ मेहकर विधानसभा मतदार संघ यांच्या वतीने मोठ्या उल्हासात सुरु आहे.
Discussion about this post