पुणे : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने रविवारी (29 डिसेंबर)भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त होत असलेल्या तयारीची आणि विजयस्तंभ च्या सजावटीची पाहणी करण्यात आली. मंगळवारी(31 डिसेंबर) युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य टू व्हीलर बाईक रॅलीचे नियोजन असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी दिली आहे.
01 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे विजयस्तंभला सलामी देण्यासाठी सकाळी येणार आहेत या पार्श्वभूमीवर नियोजन आणि व्यवस्था याबद्दल पोलीस उपायुक्त (झोन 4) हिम्मत जाधव यांच्याशी वंचित बहुजन आघाडीने चर्चा केली.
यावेळी वंचित बहुजन आघाडी च्या शिष्टमंडळामध्ये पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, उपाध्यक्ष हिराभाऊ वाघमारे, उपाध्यक्ष अजय भालशंकर, उपाध्यक्ष विकास भेगडे पाटील, उपाध्यक्ष जीवन रोकडे, संघटक माणिक लोंढे, संघटक सतीश रणवरे, सचिव प्रा.बी.पी सावळे, उपाध्यक्ष प्रमोद वनशिव, सहसचिव पितांबर धिवार, सतीश साबळे, कमलेश चाबुकस्वार, धर्मराज कदम, अमोल गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उदगीर तालुका प्रतिनिधी :-गौतम कांबळे
Discussion about this post