श्रीमान प्रदीप भनारकर व विजय डहाके यांनी 202. विद्यार्थ्यांना मिष्ठांन्न भोजन दिले
दि.29/072024.ला जि.प.मराठी शाळा केळापुर येथे शिक्षण सप्ताहाच्या स्नेह भोजना निमित्त गावातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते श्रीमान प्रदीप भनारकर व विजय डहाके यांनी 202. विद्यार्थ्यांना मिष्ठांन्न भोजन दिले.व उपस्थीत केळापूर येथील सचिव किरण चांदेकर पटवारी विकास गोरे सरपंच सुरेश अनमुलवार उपसरपंच विलास गोहने विलास डहाके शाळेच्या मुख्याध्यापिका श्रमती इंगोले मॅडम संतोष भोयर नंदू पल्हाड यांचा उपस्थितीत कार्यक्रम पार पडला प्रदिप भनारकर यांनी मुख्याध्यापिकाचे आभार मानले की त्यांनी आम्हाला आमच्या गावातील विद्यार्थ्यांची सेवा करण्याचा अवसर दिला ती शाळा आमच्या जीवनातली अनमोल सुरवात असून आम्ही गुरू दक्षिणा देणे इतके मोठे नाही परंतु फुल नाही फुलाची पाकळी नक्कीच आम्ही त्या शाळेसाठी व त्या विद्यार्थ्यांसाठी देऊ अशी आशा वेक्त करतो.
तालुका प्रतनिधी गणेश बेतवार
Discussion about this post