केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पारडी (ठवरे) या शाळेचे उत्कृष्ट यश.
दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पारडी ठवरे येथे पार पाडलेल्या केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत पारडी (ठवरे) शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. यात प्राथमिक विभागात तीन तर माध्यमिक विभागात तब्बल आठ प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविलेले आहे. तर अशा तब्बल 11 रत्नांची निवड तालुकास्तरावर होणाऱ्या नवरत्न स्पर्धेसाठी झालेली आहे. शाळेने प्राथमिक आणि माध्यमिक गट मिळून 11 प्रथम क्रमांक पारितोषिक बरोबरच द्वितीय क्रमांकचे तीन पारितोषिक मिळवलेले आहे.
प्राथमिक विभागात कथाकथन स्पर्धेत गुरुदेव कैलास ठवरे, स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धेत तनश्री वासुदेव ब्राह्मणकर, स्मरणशक्ती स्पर्धेत पियुष दिनेश ठाकरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला . तर वादविवाद स्पर्धेत तनश्री वासुदेव ब्राह्मणकर, स्वयंस्फुर्त लेखन स्पर्धेत पियुष दिनेश ठाकरे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. माध्यमिक विभागात कथाकथन स्पर्धेत समीक्षा सुधाकर भेंडारकर, स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धेत चेतन राजेंद्र खांडकुरे, वादविवाद स्पर्धेत सानिया दिलीप मेश्राम, एकपात्री भूमिका अभिनय स्पर्धेत देवयानी प्रकाश ठवरे, चित्रकला स्पर्धेत गुंजन जितेंद्र रामटेके, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत अक्षरा विलास बागडे, स्वयंस्फूर्त लेखन स्पर्धेत अक्षरा विलास बागडे, स्मरणशक्ती स्पर्धेत संघर्ष कमलेश चौधरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
बुद्धिमत्ता स्पर्धेत संघर्ष कमलेश चौधरी यांनी द्वितीय क्रमांक फटकाविला. यात मार्गदर्शक शिक्षक म्हणून श्री अशोक शेंडे वि. शि. (भाषा) श्री सुनील हटवार सर स. शि.,श्री धनराज पडोळे सर स. शि., श्री गौतम राऊत सर स. शि., सुबोध हजारे सर वि शि ( विज्ञान), श्री संदीप भुसारी सर स. शि., श्री रितेश तितरमारे सर स. शि.यांनी काम पाहिले. मुख्याध्यापक श्री. अशोक शेंडे सर , सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दिलीप मेश्राम , उपाध्यक्ष श्री. नितेश शेंडे तसेच शा . व्य. स. सदस्य श्री. युवराज ठवरे, सौ. शारदाताई मेश्राम, श्रीमती वर्षाताई बागडे, सौ.स्मिताताई ठवरे,श्री पुरुषोत्तम गेडाम, सौ. पूनमताई ठवरे, सौ.कुंदाताई भेंडारकर, केंद्रातील शिक्षकवृंद यांनी या सर्व रत्नांचे खुप खुप कौतुक आणि अभिनंदन केले. तसेच मिंडाळा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. प्रदिप मोटघरे सर यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
Discussion about this post