सोनेसांगवी गावचे मा सरपंच श्री.संभाजीशेठ निवृत्ती डांगे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डांगे सरपंच यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामदैवत हनुमान महाराज मंदिरा पाठीमगील मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी अंदाजे खर्च एक लाख रुपये खर्च करण्याचे नुसते आश्वासन न देता येत्या चार दिवसांत पेव्हर ब्लॉक बसवले जातील. मंदिराच्या पाठीमागील परिसरात पेव्हर ब्लॉक बसविल्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अजून भर पडणार आहे या कामामुळे संपुर्ण गावात मा. सरपंच श्री.संभाजीशेठ डांगे यांचे कौतुक होत आहे.
यागोदर सुध्दा डांगे सरपंच यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेसांगवी, ग्रामदैवत हनुमान महाराज मंदिरातील संपूर्ण लाईट फिटींग, फॅन, झुंबर तसेच ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालयात लागणारे साहित्य वेळोवेळी त्यांनी दिलेले आहे. दरवर्षी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते हा उपक्रम दरवर्षी राबवतात.
या वेळी विविध मान्यवरांनी त्यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघ तालुकाध्यक्ष श्री.मल्हारीशेठ आनंदराव काळे यांनीही यावेळी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्या. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, मित्र परिवार व मान्यवर मंडळी उपस्थित होते.
Discussion about this post