*लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार?
माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या योजने अंतर्गत महिलांना 2100 रुपयांची रक्कम कधीपासून मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता नव्या वर्षानिमित्त लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
या योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता मार्च महिन्यापासून महिलांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कारण मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेत नव्याने 12 लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे लवकरच यासंदर्भांत निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Discussion about this post