प्रतिनिधी:- गणेश वाडेकर
नवीन वर्षात १ जानेवारीपासून २०२५ मनपाच्या कर विभागाने कर वसुलीची तयारी सुरू केली आहे. वसुलीसाठी ५२ कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती केली आहे. २ जानेवारीपासून काम वेगाने सुरू करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत बुधवारी दिले. मालमत्ता कराची वसुली गेल्या वर्षी २०२३-२४ मध्ये ८३ कोटींची वसुली झाली होती. यंदा खासगी कंपनीला कंत्राट देऊनही त्यांची ३१ डिसेंबरपर्यंतची नऊ महिन्यांतील वसुली वसुली ५० कोटींनी कमी म्हणजे ३२ कोटी ७१ लाख रुपये आहे.
Discussion about this post