अंकित घाडीगावकर(7038556682)
सध्याचे वाढते कॉंक्रिटीकरण आणि मोठ्याप्रमाणावर वृक्ष तोडीमुळे वसुंधरा धोक्यात आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि समतोल राखण्यासाठी झाडे लावणे तसेच संगोपन करणे देखील महत्त्वाचे असते.
हाच वृक्ष संवर्धन-संगोपनाचा विचार मनात धरून तळेरे-रघुचीवाडी येथील तरूण वर्ग आणि ग्रामस्थांनी मिळून सामाजिक वनीकरण विभागामार्फत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावण्यात आलेली झाडे व सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
वन विभागाकडून जरी झाडे लावण्यात आली असली तरी संवर्धन हे आपल कर्तव्य असे सांगत,प्रत्येकाने पर्यावरण समतोल राहव आणि आपली वसुंधरा समृद्ध व्हावी यासाठी जमेल तसा हातभार लावण्याचा उत्तम संदेश ग्रामस्थांकडून समाजासमोर ठेवण्यात आला.

Discussion about this post