नवीन वर्षात १ जानेवारीपासून २०२५ मनपाच्या कर विभागाने कर वसुलीची तयारी सुरू केली आहे. वसुलीसाठी ५२ कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती केली आहे. २ जानेवारीपासून काम वेगाने सुरू करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत बुधवारी दिले. मालमत्ता कराची वसुली गेल्या वर्षी २०२३-२४ मध्ये ८३ कोटींची वसुली झाली होती. यंदा खासगी कंपनीला कंत्राट देऊनही त्यांची ३१ डिसेंबरपर्यंतची नऊ महिन्यांतील वसुली वसुली ५० कोटींनी कमी म्हणजे ३२ कोटी ७१ लाख रुपये आहे*
Discussion about this post